Wednesday, December 26, 2007

जनरेशन ग्याप

जनरेशन ग्याप

आपण बसायचो त्या टेबलावर
चहाचे कप शेअर करत
सिगारेटचा धुर आणी काड्यापेट्यांचे खेळ
रस्त्यावरुन जाणाय्रा गाडयांची
माडेल्स इंर्पोटेड
रिकामपणाची बडबड
सिनेमा ला जायचे प्लान
फिरक्या धतींग टाइम पास !
आजही त्या इराण्याच्या होटेलात
तेच सिगारेट विझवून करपलेलं टेबल
त्याच तेंव्हाच्या साका जमलेल्या
सरबताच्या बाटल्या
आणि त्या टेबलावर भेट्ले मला
तुझा लेक माझ्या कुलदिपकाकडे
लाईट मागताना !

Saturday, December 15, 2007

गझल

हसलो तर कुणाला का दुखावं ?
बोललो प्रेमानं तर का कुणी कण्हावं ?

वाट चालताना तुडवीत काटे
का फुलांनी उगाच रागवावे ?

ठेचकाळलो दगडात तरी आनंद आहे
का उगा नसलेल्या गालीच्याला आठवावे ?

उन्हातही घाम कसा थंड शांत आहे
तापल्या कायेला वाय्राचा दाह आहे

जळताना उजळला जीव क्षणभर
पळभर जीवनात तेवढाच मी आहे
असं जगावं

फुलासारखं फुलता यावं
समई होऊन जळत रहावं
मावळत्या सुर्यासोबत
सावळ्यात बुडुन जावं

फुलपाखरासारखं जगावं
दयाळासोबत गाणं गावं
असंच सुरेख सहज
वारा होऊन वाहावं

सुख द्यावं दु:ख घ्यावं
जमेल तेव्हढं हास्य फुलवावं
शांत निळ्या संध्याकाळी
कापरासारखं विरुन जावं

Thursday, December 6, 2007

फराळ
रंग पिवळा, खरपुस भाजला आणि झाली जादु
तुपसाखर एकत्र मिळुन झाला बेसनाचा लाडू

काटे आले अंगावर, वळून वळून थकली
कडक खुसखुशीत चटकदार, ही तर चकली

पोटात गोड, कीनारीला कात्री गोरा गहुवर्णी रंग
गोड करंजी खाताना होतात सारेच दंग

आकार बेढब, रंग मळकट, थोडा चविपुरता बरा
कडबोळ्याचा हल्ली विसर पडत चाललाय खरा

गुलाबासारख्या पाकळ्या, वर सुरेख साखरेचा पाक
चिरोटे विरघळले तोंडात तर रंगत जमते झ्याक

नुसताच गुंता, न सुटणारा, फरसाणची बहीण
दिवाळीचा फराळ शेवेशिवाय, विचार सुद्धा कठीण

सगळच आलं एकत्र, तरी भारतासारखा एकच रंग
चिवड्याची फक्की म्हणजे नुस्ता खमंग खमंग

ठीक्कर चॊकोनी, अगोड चव, कडा कातारलेल्या,
शंकर शोधा शंकरपाळयात, फराळात वाढलेल्या

Sunday, August 5, 2007

नको

येऊ?
"नको"
सांगु
"नको"
ऎक जरा
"नको"
चल
"नको"
बघ
"नको"
पाऊस
"नको"
ओला वारा
"नको"
भिजुया
"नको"
मंद श्वास
"नको"
मातीचा वास
"नको"
जाउ
" "

Saturday, May 26, 2007

समजेल कसं !

तुझी भाषा वेगळी
माझी भाषा वेगळी
शब्द ओळखीचे
अर्थ अनोळखी

काही सांगीतले
गुज मनातले
का जागवली
कळ तुझ्या उरातली?

कुठे दुख जुनी
सांग, सांगु कुणाला
रीते वारे वाजते
गुज आकळे ना कुणाला

सहज बोल बोले
वाटे आसुडाचा वार
मनी गोड विचार
कसा होतो तो प्रहार

कधी भेटेल सखा
माझी भाषा जाणणारा
हीतगुज करुनी
जीव सुखावणारा!

Sunday, April 22, 2007

प्रवास


केल्याने देशाटन.. वगॆरे प्रवासाचे फायदे थोरामोठ्यांनी वारंवार सांगीतले आहेतच. पण मला प्रवास का आवडतो? केवळ एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी नक्कीच नाही! एखाद्या वाहनात निवांत बसून, सर्व सुत्रें सारथ्याच्या हातात देउन, मजेत, खिडकी बाहेरील बदलती द्रुष्ये पहात, आपल्याच विचारात हरवून प्रवास करण्यासारख सुख नाही. ज्यांना वाहन चालवायला मनापासुन आवडतं, त्यांना हाच अनुभव लोंग ड्राइव्ह मध्ये मिळतो.
खय्रा सुखदायी प्रवासासाठी खिडकीजवळ बसणं फ़ार महत्वाचं! पाठीमागच सगळं जग विसरुन, खिडकीबाहेरच्या जगात स्वता:ला झोकुन द्यायचं. वेगानं मागे जाणय़्रा झाडां- घरांबरोबर आणि मॆलांच्या दगडांबरोबर, मनही धावु लागतं. रोजच्या जिवनातले ताण-तणाव, श्रम, कामांचा तोचतोपणा ह्यात गुंतलेले मनाचे धागे हळुहळु मोकळे होऊ लागतात. एखादं आवडतं गीत मनात रुंजी घालु लागतं, चाकांचा खडखडाट त्याला सहजच ताल धरतो आणि ब्रम्हानंदी टाळी लागते.
खिडकी नाहीच मिळली तर लक्ष सहप्रवाशांकडे वळवायचं. विविधतेनं संपन्न असं मोठं मजेदार नाट्य येथे उलगडत असतं. प्रत्येकाची बसायची नाही तर उभं रहायची पद्धत, बोलायची कींवा अगदी गप्प रहायची ढब, चेहय्रावरचे बदलणारे भाव, मधेच डुलकी लागल्यावर डोलणारं आणि हळुच शेजार्याच्या खांद्यावर विसावणारं डोकं, त्याचा त्रासीक चेहरा.. एकत्र असुनही स्वत:च वेगळेपण जपणारी प्रत्येक व्यक्ती सहप्रवाशांच्या सोबतिनं, पाण्यात साखर विरघळावी तशी, तेवढ्यापुरति का होइना, एकरुप होऊन जाते, चोरुन, आवरुन घेतलेली अंग मोकळि पडत जातात, खाण्याच्या डब्यांबरोबर, चुना-तंबाखुच्या देवघेवीबरोबर, मनातल्या सुखदुख:चे आणि अनुभवांचे कप्पेही हलकेच उलगडू लागतात. प्रवासापुरते कींवा कधी त्यापलीकडेही टिकणारे भावबंध निर्माण होतात.
वाटेतली थांबण्याची ठिकाणं, तेथलें आवाज, वास, चहा आणि खाण्यांच्या खास चवी, विक्रेत्यांच्या चित्रविचित्र ललकाय्रा, ससत बसुन आखडलेल्या शरीराला हातपाय ताणुन मिळणारा विसावा, आणि पुन्हा प्रवास सुरु. हेच तर साय्र्या आयुष्याचं सार आहे, कारण जिवन म्हणजे एक सततचा प्रवासच नाही का?