Thursday, March 27, 2008

मी एकटा

मी एकटा
शोधु नको मला माझ्या मध्ये अता
त्या पुर्वीच्या माझियाचि केली मी सांगता

प्रतिबिंब दर्पणातील आहे अनोळखी
परतुन मी पहातो भलताच कोण दिसता

काही खुणा पुराण्या अजुनी राहीलेल्या
सुकल्या फुलामधुनी जाणवतो गंध नसता

गेला बहर उडुनी वारा उठे धुळीचा
द्रव पापण्यां मधुनी उरला ओलेपणाचा

निनाद सुनेपणाचा हलकेच साद घाली
हा एकटेपणा हा उरला सोबतीचा

पसरे उजाड कातळ काळया कपारींचा
अजुनी खळाळ आहे कुठे खोल आठवाचा

जळला नि धूरही विरला, होता इथे कधी तो?
अंकुरावे पुन्हा भिजुनी, इंतजार बरसातीचा