फराळ
रंग पिवळा, खरपुस भाजला आणि झाली जादु
तुपसाखर एकत्र मिळुन झाला बेसनाचा लाडू
काटे आले अंगावर, वळून वळून थकली
कडक खुसखुशीत चटकदार, ही तर चकली
पोटात गोड, कीनारीला कात्री गोरा गहुवर्णी रंग
गोड करंजी खाताना होतात सारेच दंग
आकार बेढब, रंग मळकट, थोडा चविपुरता बरा
कडबोळ्याचा हल्ली विसर पडत चाललाय खरा
गुलाबासारख्या पाकळ्या, वर सुरेख साखरेचा पाक
चिरोटे विरघळले तोंडात तर रंगत जमते झ्याक
नुसताच गुंता, न सुटणारा, फरसाणची बहीण
दिवाळीचा फराळ शेवेशिवाय, विचार सुद्धा कठीण
सगळच आलं एकत्र, तरी भारतासारखा एकच रंग
चिवड्याची फक्की म्हणजे नुस्ता खमंग खमंग
ठीक्कर चॊकोनी, अगोड चव, कडा कातारलेल्या,
शंकर शोधा शंकरपाळयात, फराळात वाढलेल्या
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment