Saturday, December 15, 2007

असं जगावं

फुलासारखं फुलता यावं
समई होऊन जळत रहावं
मावळत्या सुर्यासोबत
सावळ्यात बुडुन जावं

फुलपाखरासारखं जगावं
दयाळासोबत गाणं गावं
असंच सुरेख सहज
वारा होऊन वाहावं

सुख द्यावं दु:ख घ्यावं
जमेल तेव्हढं हास्य फुलवावं
शांत निळ्या संध्याकाळी
कापरासारखं विरुन जावं

No comments: