Saturday, May 26, 2007

समजेल कसं !

तुझी भाषा वेगळी
माझी भाषा वेगळी
शब्द ओळखीचे
अर्थ अनोळखी

काही सांगीतले
गुज मनातले
का जागवली
कळ तुझ्या उरातली?

कुठे दुख जुनी
सांग, सांगु कुणाला
रीते वारे वाजते
गुज आकळे ना कुणाला

सहज बोल बोले
वाटे आसुडाचा वार
मनी गोड विचार
कसा होतो तो प्रहार

कधी भेटेल सखा
माझी भाषा जाणणारा
हीतगुज करुनी
जीव सुखावणारा!

No comments: